

भोकरदन ः भोकरदन शहरात जाफराबाद व सिल्लोड मार्गावर अवैधपणे देशी विदेशी दारु विकणाऱ्या तीन जणाविरोधात भोकरदन पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडू 10,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंकुश एकनाथ तळेकर रा. पोस्ट ऑफीस , सतिष सर्जेराव गाढेकर रा. बाजरपटटी भोकरदन, विठठल शेषराव उबाळे रा. मासनपुर , सदाशिव नारायण अंभोरे रा. कोसगाव यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक पवन राजपुत, पोलीस उपनिरीक्षक . राकेश नेटके,, शिवाजी जाधव, लक्ष्मण रानगोते, जावेद शेख, दिपक इंगळे यांनी केली आहे.