

Accused of stealing tractor trolley, iron grill arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली व लोखंडी ग्रील चोरणाऱ्या दोन आरोपींना तालुका जालना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुका जालना पोलिस ठाण्यात नवीनम मोंयातील निलेश सुरेशचंद्र सारस्वत यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्या बांधकामाच्या जुन्या वापर-लेल्या लोखंडी खिडक्यांनी भरलेली ट्रॉली १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी कोणीतरी चोरट्यांनी अज्ञात गोकुळधाम येथून चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या ट्रॉली व लोखंडी खिडक्याचे ग्रिल यांचा शोध डी.बी पथकाचे पोलिस कर्मचारी घेत असताना त्यांना जालना तालुक्यातील इंदेवाडी येथील पृथ्वीराज शिंदे व विशाल गणेश घुले यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली व खिडकीचे लोखंडी ग्रिल चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी चोरीचा माल दुसऱ्या जिल्ह्यात एका शेतात लावल्याचे सांगितले. सदरचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यात ट्रॅक्टर ट्रॉली व खिडकीचे लोखंडी ग्रिल असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कामगिरी
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, जमादार सचिन आर्य, पोलिस कर्मचारी बालासाहेब गाडेकर, वसंत धस, विशाल काळे, कृष्णा भंडागे, राम शेडीवाले, चंद्रकांत माळी, दयानंद मोर, चालक परमेश्वर हिवाळे यांनी पार पाडली आहे.