Jalna Crime News : विदेशी दारूसह आरोपी जेरबंद; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात आले.
jalna news
विदेशी दारूसह आरोपी जेरबंद; एक लाखाचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on
Updated on

Accused arrested with foreign liquor; Goods worth one lakh seized

जालना, पुढारी वृत्तसेवाः अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून एकूण १ लाख ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

jalna news
पावणेपाच कोटींच्या दंडाची वसुली रेंगाळली

पोलिस ठाणे मोजपुरी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना जालना-मंठा रोडवरील बापकळ फाट्यावर आरोपी अरविंद प्रकाश लांडगे (रा. जामवाडी, ता. जालना) हा मोटारसायकलवरून विदेशी दारू विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपीकडून इम्पिरियल ब्लू व रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूच्या १९ बाटल्या तसेच सुमारे ८० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण १,०३,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

jalna news
Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील पेयजल केंद्रावर अवकळा

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगेश उबाळे, पोलीस अंमलदार संभाजी तनपुरे, रुस्तुम जैवाळ, प्रभाकर वाघ, कैलास खार्डे, देविदास भोजने, इरशाद पटेल आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news