Jalna Crime News : ट्रकचालकांना अडवून लूटमार, राजूर रोडवर मध्यरात्रीची घटना, आरोपी जेरबंद

या गुन्ह्याच्यावेळी वापरण्यात आलेली काळी स्कार्पिओ पोलिसांनी जप्त केली.
Jalna Crime News : ट्रकचालकांना अडवून लूटमार, राजूर रोडवर मध्यरात्रीची घटना, आरोपी जेरबंद
Published on
Updated on

Accused arrested for robbing truck drivers

जालना, पुढारी वृत्तसेवा जालना-राजुर रोडवर बुधवारी मध्यरात्रीनंतर काळ्या रंगाच्या स्कार्पिओमधून येउन ट्रकचालकांना लुटणाऱ्या तीन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केले. या गुन्ह्याच्यावेळी वापरण्यात आलेली काळी स्कार्पिओ पोलिसांनी जप्त केली.

Jalna Crime News : ट्रकचालकांना अडवून लूटमार, राजूर रोडवर मध्यरात्रीची घटना, आरोपी जेरबंद
Jalna News | सुखापुरी फाटा येथे शेतकऱ्यांचे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन

जालना-राजूर रोडवरील सुरज पेट्रोलपंपा जवळील मानदेऊळगांव परिसरात २३ जुलै रोजी मध्यरात्री ०१.०० ते ०३.०० वाजेच्या दरम्यान राजूरकडून जालनाकडे येणाऱ्या दोन ट्रकचालकाना काळ्या रंगाच्या विना क्रमांक असणाऱ्या स्कार्पिओतील आरोपींनी गाडी रोडवर आडवी लावून ट्रकमधील चालक व क्लीनर याना मारहाण करून दहशत निर्माण करून त्यांच्याकडील १६ हजार रुपये लुटून नेल्याची तक्रार राजेंद्र कुमार कसवा (रा. बिकानेर राजस्थान) यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तत्काळ एक पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठविले.

Jalna Crime News : ट्रकचालकांना अडवून लूटमार, राजूर रोडवर मध्यरात्रीची घटना, आरोपी जेरबंद
Jalna News : शिक्षकांसाठी विद्यार्थी, पालकांचा रास्ता रोको

यावेळी संशयीत विलास तुकाराम पवार (रा. बावणे पांगरी), रवी देविदार जाधव (रा. पठार देऊळगाव), तानाजी कारभारी कंठाळे (रा. तुपेवाडी, ता. बदनापूर) यांनी सदर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली काळ्या रंगाची विना क्रमांची स्कार्पिओ व मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि रवी देशमाने, पोउपनि मारियो स्कॉट, सपोउपनि मन्सुब वेताळ, कृष्णा शिंदे, जमादार प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र पवार, जोहरसिंग कलाणी, साई पवार, रवी देशमुख, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे चालक संग्रामसिंग ठाकूर, काकासाहेब बोट यांनी केली आहे. आरोपींनी केलेल्या या लूटमारीच्या घटनेमुळे ट्रकचालकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

२६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. सदर आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याचे शक्यता आहे आहे. पो.नि. बाळासाहेब पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news