

Absconding accused of murdering woman arrested
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील खडकी येथील महीलेचा पैशाच्या देवाण घेवाणीतून खून करुन मृतदेह कपशीच्या शेतात टाकून देण्याची घटना शनिवार (६) रोजी घडली होती. हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणात आरोपीस तत्काळ अटक करीत गुन्हा उघडकीस आणला.
भोकरदन तालुक्यातील खडकी येथील उषाबाई भास्कर सदाशिवे (४०) या महिलेचा शनिवारी अज्ञात इसमाने खुन करुन कपाशीच्या शेतात मृतदेह टाकुन दिला होता. या प्रकरणात पोलिसांकडे पुरावा नसतांना त्यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेणे सुरु केला असता पोलिसांना खबऱ्याने माहीती दिली की, मयत महीलेचे चांदई टेपले येथील इसम नामे शरद शिवाजी राऊत याच्याशी पैशाच्या देवाण घेवाणीतुन भांडण झाल्याची माहीती समोर आली.
त्यानंतर संशयीत इसमाचा मोबाईल नंबर मिळवुन पोलिसांनी त्याचे टॉवर लोकेशन घेतले असता तो जावळेवाडी शिवार येथील शेतातील घरी असल्याचे निदर्शनास आले.