जालना : इतका निष्ठूर का झाला बाप? पोटच्या तीन पोरांना विहीरीत फेकले; डोमेगाव येथील घटना | पुढारी

जालना : इतका निष्ठूर का झाला बाप? पोटच्या तीन पोरांना विहीरीत फेकले; डोमेगाव येथील घटना

शहागड; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील हृदयद्रावक घटना आज (दि. १४) उघडकीस आली आहे. पोटच्या पोरांना विहीरीत ढकलून ठार मारल्याची घटना घडली आहे. या हत्येची माहिती देऊन आरोपी पित्याने मोबाईल बंद केला. डोमेगाव येथील पोलीस पाटलांच्या विहिरीत तीन मुलांचे मृतदेह आढळले. संतोष धोंडीराम ताकवले असे संशयित आरोपीचे नाव आहे.

शिवानी (वय 8), दिपाली (वय 7), सोहम (वय 11) अशी मयत मुलांची नावे आहेत. संशयित आरोपी मुळचा कातराबाद येथील आहे. मुरमा फाटा येथील एका हॉटेलवर तो कामाला आहे. संशयित आरोपी पित्याला औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यानंतर अंबड पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले. मृतदेहांचे सोमवारी सकाळी अबंड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान अंबड उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी जमली होती. पत्नीसोबतच्या भांडणातून पती संतोष ताकवले यांनी रागाच्या भरात मुलांना विहिरीत फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

Back to top button