

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसी समाजाच्या साखळी उपोषणाला राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जाता जाता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साखळी उपोषणाला भेट दिली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे. याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, राज्य सरकारची पूर्वीपासूनची भूमिका आहे की, ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. दरम्यान मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवालीत आल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.