जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी एकाला अटक | पुढारी

जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी एकाला अटक

शहागड; पुढारी वृत्‍तसेवा अंतरवाली सराटी येथे पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात झालेल्‍या लाठीहल्ला, दगडफेकीच्या घटनेतील पहिला संशयीत आरोपी ऋषिकेश बेदरे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक साधा मोबाईल फोन जप्त केला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व महसूल अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून पोलिसांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता.

ऋषिकेश बेद्रेवर गावठी पिस्तूल प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कट रचणे, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणे, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून खाजगी वाहन जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व संबंधित प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ऋषिकेश बेदरे (रा. गेवराई, जि. बीड) याचे पहिले नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातीलच संशयीत आरोपीचा तपास घेत असताना ऋषिकेश कैलास बेदरे व दोघांकडे २० हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी धातूचे पिस्टल, २०० रुपये किमतीचे ७.६५ एमएमचे दोन जिवंत काडतुसे, १ हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा मोबाइल, असा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button