Jalna News : चार हजार शेतकरी ४० कोटींच्या अनुदानापासून वंचित

महाबीटीच्या मंजुरीपत्राची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वडीगोद्रीत होळी
4,000 farmers deprived subsidy
Jalna News : चार हजार शेतकरी ४० कोटींच्या अनुदानापासून वंचितfile photo
Published on
Updated on

4,000 farmers deprived of ₹40 crore subsidy

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाडीबीटीच्या ४० कोटींच्या अनुदानापासुन जिल्ह्यातील चार हजार शेतकरी वंचित राहिल्यीने वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी दिनी मंजुरीपत्रांची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात आले.

4,000 farmers deprived subsidy
Mahadbt portal technical issue | कृषीची महाडीबीटी पूर्वसंमती सेवा सहा महिन्यांपासून ठप्प...

कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेंतर्गत कृषी यंत्र, अवजारे व विविध कृषी साहित्य खरेदी करूनही जिल्ह्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांचे तब्बल ४० कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधत वडीगोद्री येथे तीव्र निषेध आंदोलन छेडले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १) सकाळी १० वाजता आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या कृषी यंत्र, अवजारे व साहित्य खरेदीच्या पूर्वसंमती मंजुरीपत्रांची होळी करून शासनाच्या निष्क्रिय आणि शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रलंबित अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली.

4,000 farmers deprived subsidy
Majalgaon Farmers Protest : कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा; शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवला

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कृषी यंत्रसामग्री खरेदी केली असून, शासनाच्या विलंबामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यंत्र आवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या सात महिन्यांपासून अनुदान रखडले आहे. कृषी दिनीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ शासनाच्या नाकर्तेपणामुळे येत असल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी व्यक्त केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, अंबड तालुका अध्यक्ष उमेश पाष्टे, तालुका उपाध्यक्ष अशोक गायकवाड, कार्याध्यक्ष मुकेश डुचे, ज्येष्ठ नेते बप्पासाहेब काळे, बाबासाहेब दखणे, अंकुश तारख, भारत उंडे आदींची उपस्थिती होती.

तीव्र आंदोलन करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, जालना जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपयांहून अधिक अनुदान रखडले असून, शासनाने तातडीने निधी वितरित न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news