

जवळा बाजार : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर काम केलेले मुनीर पाटील यानी पक्षातील गटबाजीस कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला होता. पण आज पुन्हा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार पक्षात शरदचंद्र पवार यांचा उपस्थितीत वसमत येथील महाविकास आघाडीतील प्रचार सभेत मुनीर पाटील यांनी स्वगृही राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षात मान्यवर उपस्थितीत प्रवेश केला आहे.
जवळाबाजार येथील मुनीर पाटील यानी राजकिय क्षेत्रात राष्ट्रवादी पक्ष मध्ये बरेच वर्ष काम केले होते. त्याचा कामाची हिंगोली जिल्ह्यातील दखल घेऊन मा. शरदचंद्र पवार यांनी त्याची बरेच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली होती. त्याचा काळात राष्ट्रवादी पक्ष जिल्हातील गटबाजी नष्ट करून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष बळकट केला होता पण पक्षातील गटबाजीस कंटाळून त्यानी राष्ट्रवादी पक्ष सोडला होता नंतर वंचित बहुजन आघाडीत मागील विधानसभातील निवडणुकीत उमेदवार होते. पण निवडणुकीत पराभव झाला नंतर पुन्हा वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडून काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेस पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष पदावर मुनीर पाटील काम करीत होते. वसमत विधानसभातील निवडणुकीत काँग्रेस पक्ष कडून इच्छुक होते. पण आघाडीत वसमत विधानसभातील निवडणुकी उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटास मिळाला नंतर अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली. नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष या वेळेस उमेदवार नसल्याने भविष्यात हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष केवळच नावालाच रहाणार अशी परिस्थितीत सध्याच काळात जवळपास निर्माण झाली.
त्यामुळे काँग्रेस पक्ष मध्ये राहुन उपयोग भविष्यातील राजकारणात नाही याची दखल घेऊन आज वसमत येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा प्रचार साठी मा. शरदचंद्र पवार यांची सभा ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वसमत येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत मा. मुनीर पाटील यानी स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या वेळेस मा. शरदचंद्र पवार यानी मुनीर पाटील याचा पक्ष प्रवेश बद्दल सत्कार करण्यात आला आहे त्याचा पक्ष प्रवेश पुन्हा भविष्यात जवळाबाजार परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पुन्हा 'फिर वही दिल आया हू' चित्र पहावयास मिळणार आहे.