औंढा नागनाथ: तालुक्यात यापूर्वी रुपुर माथा परिसरात बिबट्या दिसून आला होता. आता शिरोड शहापूर परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचा वावर असल्याचे २७ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या निदर्शनात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान वन विभागाने केले आहे. रुपुर धार माथा शिवारात नदीपात्रात बिबट्याला शेतकऱ्यांनी पहिले होते. वन विभागाला मात्र तिकडे बिबट्या दिसून आला नाही.
शिरड शहापूर शिवारात शेतकऱ्याचे आखाडे आहेत. याबाबत वन विभागाला माहिती देताच वन परिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल हनुमंत रावण पल्ले वनरक्षक जी एन गारुळे यांच्या पथकाने तात्काळ या भागात पाहणी केली. शिरड शहापूर शिवारात बिबट्या आला असावा असा अंदाज बांधला जात आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ वास्तव्यात रहात नसल्याने शेतकरी शेतमजूरांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.