हिंगोली: औंढा नागनाथ येथील तहसीलला आज (दि.२९) आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाले. सदर साहित्य जिल्हा अपत्ती व्यवस्थापन समितीकडून औंढा नागनाथ तालुक्याला मिळाले आहे. साहित्य हे पावसाळ्यापूर्वी प्रत्येक तहसील अंतर्गत पोहोचायला हवे होते मात्र जिल्हा नियोजन समितीकडून त्याची दखल न घेतली गेल्यामुळे सदर साहित्य पावसाळा उलटून गेल्यानंतर मिळाले आहे.
अनेक लोक या साहित्याकडे कुतुहलाने बघत होते. या साहित्यामध्ये एकूण 150 लाईफ जॅकेट 50 लाईफ बॉय रिंग, एक रेस्क्यू बोट, 3 चेन वूड कटर, 3 सेफ्टी हार्नेस, 5 तुफान टॉर्च, 5 अहुजा मेगा फोन 10, दोन केजी एफओ फायर बॉल इत्यादी आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य आज औंढा नागनाथ तहसीलला मिळाले आहे. अनेक लोक या विषयाकडे कुतुहलाने बघून यावर्षी नाही ते नाही, पण पुढील वर्षी तरी हे साहित्य नक्कीच उपयोगी पडेल असे बोलत आहेत.