Hingoli Crime : अल्पवयीन मुलास फूस लावून पळविले

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

वसमत : येथून अल्पवयीन मुलास फूस लावून पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या मुलाच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.

वसमत येथील रहिवासी असलेले जवान केंद्रीय राज्य राखीव दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी ते एक महिन्याची सुट्टी घेऊन कुटुंबासह वसमत येथे आले होते. गुरुवारी त्यांचा मुलगा बाहेरून नाश्ता करून येतो असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ तो घरी परतला नाही. मात्र तो मित्राकडे गेला असेल असे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

Crime  News
Sambhajinagar murder case : छावणी पोलिसांच्या एका चुकीने खुनातील आरोपी मोकाट !

वसमत तालुक्यासह बाहेर जिल्ह्यात राहणाऱ्या नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली मात्र तो नातेवाईकांकडेही गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी वसमत शहर पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली.

Crime  News
Ratnagiri Crime | शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; भाटिमिऱ्या येथील एकजण गंभीर जखमी

यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द अप-हरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलिस निरीक्षक खंडारे, जमादार शेख नय्यर यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी वसमत शहरातील मुख्य बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून त्याचे अखेरचे लोकेशन कुठे आहे याची माहिती घेतली जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक खंडारे पुढील तपास करीत आहेत. त्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news