Hingoli News : डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने हिंगोलीत गर्भवतीच्या पोटात अर्भक दगावले

प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याचा नातेवाईकांचा आरोप
hingoli news
Published on
Updated on

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील गरोदर महिलेस वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खासगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. मात्र, तेथे सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर अर्भक दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला.

दरम्यान, डिझेल होते; पण चालक नसल्याने अडचण झाल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. रुग्णाचे नातेवाईक आणि आरोग्य प्रशासनाच्या दाव्या-प्रतिदाव्यांमध्ये निष्पाप अर्भकाचा मात्र नाहक बळी गेल्याने संतापाची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

नालेगाव येथील महिला मनीषा इंगळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी हिंगोलीच्या सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने 102 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, त्यांना डिझेल नसल्याचे सांगण्यात आले. 108 क्रमांकावरूनही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलेस खासगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

हिंगोलीच्या सरकारी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर मनीषा यांच्या गर्भाशयात प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्याने तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, यामध्ये अर्भक दगावले. केवळ डिझेलअभावी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अर्भक दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सविस्तर चौकशी करणार

या अर्भक मृत्यूची सविस्तर चौकशी संबंधित ठिकाणी वैद्यकीय पथक पाठवून केली जाणारआहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news