

Shri Gajanan Maharaj Palkhi Hingoli Jawalabazar
जवळाबाजार : श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर कडे पालखीचे सोमवारी (दि. २) सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले. सलग ५६ व्या वर्षी पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाली. दि. ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल. ४ जुलै ते ९ जुलै पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम असेल. १० जुलैरोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन ३१ जुलैरोजी पालखी श्रीक्षेत्र शेगाव येथे दाखल होईल.
श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज पालखीचे जवळाबाजार येथे १४ जूनरोजी आगमन होणार आहे. येथील सचिन अशोककुमार जैन व संदिप अशोक कुमार जैन व जैन परिवाराकडून वारकरी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखीचा जिल्हा परिषद शाळेत मुक्काम राहणार आहे.
पालखीचा मुक्काम पारस, भौरद , वाडेगाव, पातुर, श्री क्षेत्र डवहा, श्री क्षेत्र शिरपूर, महसला पेन , रिसोड मार्ग १२ जून रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आगमन होणार असून १३ जून दिग्रस, १४ जून जवळा बाजार , १५ जून श्री क्षेत्र त्रिधारा , १६ जून परभणी, १७ जून दैठणा , १८ जून गंगाखेड , १९ जून परळी थर्मल, २० जून परळी वैजनाथ , २१ जून अंबाजोगाई, २२ जून बोरी सावरगाव , २३ जून कळंब, २४ जून तेरणा सहकारी साखर कारखाना, २५ जून उपळा, २६ जून धाराशिव, २७ जून श्रीक्षेत्र तुळजापूर , २८ जून उळे, २९ व ३० जून सोलापूर, १ जुलै तिरहे , २ जुलै मानपुर , ३ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा, ४ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल.
परतीचा मार्ग करकंब, कुरूडवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी , जालना, सिंदखेडराजा , बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिरला नेमाने , आवार, खामगाव व ३१ जुलैरोजी श्री क्षेत्र शेगाव येथे श्री गजानन महाराज पालखी पोहोचणार आहे. श्री गजानन महाराज संस्थान पालखीचा वारकरी मार्गावर चहापाणी, फराळ, जेवण, रात्रीचा मुक्काम याचे नियोजन मार्गावरील भाविक भक्त मंडळीकडून करण्यात येणार आहे.