Sand Smuggler News : विदर्भातील वाळू तस्कराची महसूलसह पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ

पोलिसी खाक्या दाखवताच उतरली झिंग, माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल
Illegal sand transport
Illegal sand extraction : Sand Smuggler News : विदर्भातील वाळू तस्कराची महसूलसह पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळFile Photo
Published on
Updated on

Sand Smuggler from Vidarbha Abuses Police and Revenue Officials

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली भागात मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचे टिप्पर पकडल्यानंतर महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाशिमच्या वाळू तस्कराची पोलिसांनी झिंग उतरवली. आपली चूक झाल्याची उपरती झाल्यानंतर त्याने माफी मागितली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Illegal sand transport
Illegal Sand Transport : विदर्भातील वाळू तस्करीचे रॅकेट उघड

विदर्भातील वाशिम भागातून एका टिप्परमधून गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे व पथकाने गोरेगाव ते सेनगाव रोडवरील गोरेगाव चौफुलीवर एक टिप्पर थांबवून चालक समाधान राऊत (रा. तोंडगाव, जि. वाशिम) याची चौकशी केलीअसता त्याला समाधानकारक उत्तरे देता आले नाही.

त्यामुळे सदर वाळू अवैध असल्याने उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी टिप्पर गोरेगाव पोलिस ठाण्यात आणण्याच्या सूचना दिल्या. यावेळी एका बोलेरो जीपमधून आलेल्या संजय गोरे (रा. तोंडगाव, जि. वाशीम) याने त्या ठिकाणी येऊन टिप्पर समोरच जीप उभी केली अन टिप्पर नेण्यास मज्जाव केला तसेच चालक राऊत यास पळवून लावले. यावेळी त्याने गोंधळ घालून घुटुकडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र त्याच्या धमकीला भीक न घालता घुटुकडे यांनी गोरेगाव पोलिसांना पाचारण केले.

गोरेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संजय गोरे याने पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच आर्थिक देवाण घेव- ाणीचे आरोपही लावले. टिप्पर पेटवून देण्याची धमकीही दिली. मात्र यावेळी पोलिसांनी नमते घेत त्याला गोड बोलून ताब्यात घेतले अन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर फरार झालेल्या टिप्पर चालक समाधान राऊत यालाही ताब्यात घेतले.

Illegal sand transport
Illegal Sand Transport | व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस, महसूल प्रशासनाची पोलखोल; हिंगोली जिल्ह्यात ‘हप्ता’ चर्चेने खळबळ

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. त्या ठिकाणी त्याचा चांगलाच पाहुणचार केला. त्यानंतर संजय गोरे याला उपरती झाली अन त्याची चुक कळली. त्याने लगेचच व्हिडीओ तयार करून महसूल अधिकारी व पोलिसांची माफी मागितली. सदर व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news