

औंढा नागनाथ: तालुक्यातील पिंपळदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज व समाधान शिबिराचे आयोजन आज ( दि. ७) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन या दरम्यान करण्यात आली होते. यावेळी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयाच्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, घरकुल विभाग, निराधार विभाग, बचत गट, आपले सरकार, पशुसंवर्धन यासह विविध विभागाच्या स्टॉलवरून ग्रामस्थांना माहिती दिली.
यावेळी तहसीलदार अनिता कोलगणे, सरपंच रत्नमाला संजय भुरके, गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, गटशिक्षणाधिकारी साहेबराव नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता आर. एस. नरवाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे, आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गोविंद काळे, मंडळ अधिकारी रंगनाथ मेहत्रे, तलाठी विठ्ठल शेळके, तलाठी माधव भुसावळे, संजय पाटील, नंदा डाके, गोरक्षनाथ गोयकर, विस्तार अधिकारी सय्यद जमीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी जमरे, डॉ. दामोदर गोरे , ग्रामसेवक सुनील मुळे, कृषी सहाय्यक अक्षय राठोड, सुभाष पाचपुते, नितेश कुलकर्णी, किसन फलटणकर, कैलास जाधव , केशव फलटणकर , पप्पू मोरे, विशाल भूक्तर, आदींची उपस्थिती होती. विविध स्टॉलला अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी लाभार्थ्यांची व अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.