बाजार समितीत हळदीच्या २०० गाड्यांच्या रांगा

सोयीसुविधा नसल्याने मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास
hingoli news
बाजार समितीत हळदीच्या २०० गाड्यांच्या रांगाfile photo
Published on
Updated on

Queues of 200 Turmeric Trucks at the Market Committee

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात हळदीच्या तब्बल २०० गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मागील काही दिवसांपासून मोंढ्याला सुट्ट्या असल्यामुळे, शुक्रवारी संध्याकाळपासूनच विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणून गाड्या रांगेत लावल्या आहेत. मात्र, दोन-तीन दिवस येथे मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना सुविधांअभावी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

hingoli news
Nanded news | किनवट बाजार समितीचा कारभार चव्हाट्यावर; सोयाबीनचे चुकारे थकल्याने गोदामाला ठोकले सील

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कायम चांगला भाव मिळतो. याच आशेने विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून शेतकरी आपला शेतमाल घेऊन हिंगोलीत येतात.

hingoli news
Gudi Padwa : बाजारपेठेला सातशे कोटींची सुवर्णगुढी

सध्या आवक वाढल्याने बाजार समिती परिसरात हळदीच्या गाड्यांनी मोठी गर्दी केली आहे. शुक्रवारपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजार समितीच्या हॉलमध्ये मुक्काम ठोकला आहे. मात्र याठिकाणी कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news