प्रवीण काळबांडे ठरले सुपर रॅन्डोन्यूअर किताबाचे मानकरी

सहाशे किमीचे अंतर पार केले अवघ्या ३७ तासांत
Hingoli News
प्रवीण काळबांडे ठरले सुपर रॅन्डोन्यूअर किताबाचे मानकरीFile Photo
Published on
Updated on

Praveen Kalbande wins the Super Randonneur title

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा येथील सायकलपट्ट प्रवीण काळबांडे यांनी अमरावती ते जळगाव व परत जळगाव ते अमरावती असे सहाशे किलोमीटरचे अंतर ३७ तासांत पार करून सुपर रॅन्डोन्यूअर किताब पटकावला. अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा किताब पटकावला आहे.

Hingoli News
Hingoli Crime | रुमालाने गळा आवळून तरुणाचा खून, संशयित शेकोटी करून मृतदेहाजवळ रात्रभर बसून

हिंगोलीचे सायकलपट्टू प्रवीण काळबांडे यांनी मागील पाच ते सहा वर्षांपासून सायकलिंग सुरू केली. वाहनांच्या धावत्या युगात सायकलिंग करून आरोग्य राखण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलिंग सुरू केली. त्यानंतर त्यांनी जा नेवारी महिन्यात ऑडिक्स इंडियामार्फत बीआरएम सायकलिंगचे रजिष्ट्रेशनदेखील केले होते. सदर सायकलिंग केवळ जिंकण्यासाठी नव्हे तर ठराविक वेळेत विशिष्ट अंतर पार करून निखळ आनंद मिळविणे हा आहे.

यामध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटूंना रॅन्डोन्यूअर म्हटले जाते. दरम्यान, बीआरएममध्ये २०० किलोमीटर, ३०० किलोमीटर, ४०० किलोमीटर, ६०० किलोमीटर, १००० किलोमीटर अशा अंतराच्या राईडस असतात. एका वर्षात सहाशे किलो मीटरपर्यंतच्या राईडस् यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या सायकलपहुंना सुपर रॅन्डोन्यूअर हा किताब दिला जातो. एका वर्षात या सर्व राईडस् पूर्ण करणे आवश्यक आहे. हिंगोली येथील प्रवीण काळबांडे यांनी वाशीम सायकलिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली २०० किलोमीटर, ३०० किलोमीटर, ४०० किलोमीटरच्या राईडस् पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर २० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली सहाशे किलोमीटरची राईड पूर्ण केली आहे.

Hingoli News
Aundha Nagnath Protest | औंढा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण

अमरावती ते जळगाव व परत जळगाव ते अमरावती हे ६०० किलोमीटरचे अंतर ४० तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार २० डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या राईडमध्ये एकूण १९ जणांनी सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे यामध्ये दोन महिला स्पर्धकांचाही सहभाग होता. दरम्यान, हिंगोलीच्या प्रवीण यांनी २० डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुरू केलेली राईड सलग ३७ तास सायकल चालवून पूर्ण केली आहे. संघटनेच्या वतीने दिलेल्या ४० तासाच्या उद्दिष्टाच्या पूर्वीच ही राईड पूर्ण करून सुपर रॅन्डोन्यूअर किताबाचे मानकरी ठरले आहेत. सदर किताब जिंकणारे हिंगोलीतील ते एकमेव सायकलपटू आहेत.

सध्या धकाधकीच्या जिवनात सायकलिंग आवश्यक आहे. मात्र सर्वच जण वाहनांचा वापर करू लागले आहेत. आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून देणार असल्याची प्रतिक्रिया प्रवीण काळबांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news