Hingoli Accident | औंढा नागनाथ येथे ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात : कार झाली चक्काचुर

औंढा नागनाथ शहरातील बस स्थानका समोर मुख्य रस्त्यावर अपघात, एक गंभीर जखमी त
Parbhani Accident | औंढा नागनाथ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात : कार झाली चक्काचुर
Parbhani Accident | औंढा नागनाथ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात : कार झाली चक्काचुर
Published on
Updated on

औंढा नागनाथः औंढा नागनाथ बस स्थानकाजवळ वर्दळीच्या ठिकाणी ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक मागे जात असताना भीषण अपघात होऊन एक गंभीर तीन किरकोळ जखमी झाल्याची घटनाऔंढा नागनाथ शहरातील बस स्थानका समोर मुख्य रस्त्यावर घडली .यामध्ये एक दुचाकी, आंबे विक्रेत्याचा गाडा व कार चपेट मध्ये येऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना 31 मे रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

ट्रक क्रमांक एम एच ४० एन ५२१८ हा परभणी कडून हिंगोली कडे जात होता. औंढा नागनाथ शहरातील बस स्थानकासमोर अगदी वरदळीच्या ठिकाणी ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले . ट्रक पाठीमागे रिव्हर्स जात असताना एक दुचाकी, आंबे विक्रेते यांच्या गाड्याला टक्कर देऊन क्रमांक एम एच १४ जी डी ७७५९ या कारला धडक दिली .कार मध्ये चार जण औंढा नागनाथ मंदिराचे दर्शन घेऊन सिंगणापूर जिल्हा परभणी कडे जात होते. कारचालक वैभव ज्ञानोबा खिल्लारे वय ३२ वर्ष हे गंभीर जखमी झाले तर रूपाली वैभव खिल्लारे वय १९ वर्ष, शितल नारायण खिलारे वय २३ वर्षे, काव्या खिल्लारे सहा महिन्याची सर्व रा सिंगणापूर ता. जि.परभणी हे जखमी झाले

अपघाताची माहिती मिळताच पो. नि. जी एस राहिरे पो.उप.नि. दत्ता कानगुले, अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, अमोल चव्हाण, रमेश मस्के, यशवंत गुरुपवार, विश्वनाथ ढोणे, संदीप इंगळे, संतोष पवार अमोल चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात तर वाहतूक सुरळीत केली, ग्रामस्थ संदीप गोबाडे, इतर मित्रांनी तात्काळ जखमींना कार मधून बाहेर काढून तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कार्यक्रमानिमित्त आ.संतोष बांगर जात असताना अपघातस्थळी पाहणी करून जखमीचे विचारपूस केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news