आखाडा बाळापूरः कळमनुरी तालुक्यातील माळ धावडा येथील तंटामुक्ती समिती निवड प्रक्रियेच्या कारणावरून माजी अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के (वय ५६) यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अभिषेक बाळासाहेब मस्के यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी ८ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळ धावडा येथे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गावातील तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के हे मुलगा अभिषेकबरोबर बसले होते.त्यावेळी संगनमत करून गावातील काहीजण तेथे आले व पाठीमागील तटांमुक्त अध्यक्षपदावरुन वाद काढून अचानक लोखंडी रॉड लाकडी काठीने त्यांना मारहाण करण्यास सुरू केली.यामध्ये बाळासाहेब मस्के यांना गंभीर दुखापत झाली. मारहाणी डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.उपचार सुरु असतान प्रकृती गंभीर बनल्याने मंगळवारी १६ रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अभिषेक बाळासाहेब मस्के यांच्या फिर्यादीवरून शंकरराव भगवानराव मस्के, विकास शंकरराव मस्के, अविनाश शंकरराव मस्के, उर्मिलाबाई शंकर मस्के, विद्या विकास मस्के, रूपाली अविनाश मस्के, दिलीपराव भगवानराव मस्के, भुजंगराव दिलीपराव मस्के( सर्व राहणार माळ धावडा )त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी १४ ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपविभागीय अधिकारी, दळवे, सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक घोटके जमादार शेख बाबर ,जमादार शिवाजी पवार, जमादार रिठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.