Flag Hoisting Protocol : ध्वजवंदनाच्या प्रोटोकॉलवरून खा. वडकुते संतापले

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केला संताप
Flag Hoisting Protocol
Flag Hoisting Protocol : ध्वजवंदनाच्या प्रोटोकॉलवरून खा. वडकुते संतापलेfile photo
Published on
Updated on

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा ध्वजवंदन कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलवरून खासदार रामराव वडकुते यांनी शनिवारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा चांगलाच पाणउतारा केला. तुमचा असा प्रोटोकॉल असतो का असा सवाल करीत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी चुकीची कबुली देत माफी मागितली. त्यामुळे प्रकरण शांत झाले.

Flag Hoisting Protocol
CJP Abhijit Dipke: सरकारी स्कूल ठीक करो...!; अभियानाची हिंगोलीतून सुरुवात

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर स्वातंत्र्यदिना निमित्त मुख्य ध्वजारोहण झाले, या कार्यक्रमासाठी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे यांच्यासह अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ध्वजारोहणासाठी पालकमंत्री झिरवाळ यांना आमंत्रित केले. मात्र लोकप्रतिनिधींना तेथेच बसून रहा असे सांगितले. यावरून उपस्थित लोकप्रतिनिधींनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. ध्वजारोहणाच्या ठिकाणी नाही तर किमान त्या जागेच्या खाली उभे राहू द्या असे लोकप्रतिनिधींनी सांगितले.

Flag Hoisting Protocol
Crime News : हिंगोलीत हरणाची शिकार उघडकीस; १६ किलो मांस, कातडीसह दोघे जेरबंद

त्यानंतर ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करून एकाच जागी उभे राहिले. यावेळी खासदार वडकुते यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. आम्हाला जागेवर बसून रहा असे सांगणे कितपत योग्य आहे, लोकप्रतिनिधींना बोलण्याचा किंवा वागणूक देण्याचा असा प्रोटोकॉल असतो का असा सवाल त्यांनी केला. यावरून त्यांनी पालकमंत्री झिरवळांनाही चांगलेच सुनावले. मात्र चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री झिरवळांनी चूक कबुल करून यापुढे चूक दुरूस्त केली जाईल असे बोलल्यानंतर वादावर पडदा पडला.

प्रशासन व पालकमंत्री यांनीच याकडे लक्ष देणे अपेक्षीत होते. लोकप्रतिनिधींना जागेवरच बसून रहा असे सांगणे योग्य नव्हते. त्यामुळे आपला संताप अनावर झाला. पालकमंत्र्यांनीही चूक कबूल करून माफी मागितली आहे.
- रामराव वडकुते खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news