Fodder Shortage : चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना

उसाचे वाढे, गाळपेरा जमिनीवरील वैरण आणि मुरघास निर्मितीवर भर
Fodder Shortage
Fodder Shortage : चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना file photo
Published on: 
Updated on: 

Measures to Overcome Fodder Shortage

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. ऊसाचे वाढे, पाटबंधारे प्रकल्पांच्या गाळपेरा जमिनीवरील वैरण, वनक्षेत्रातील गवत आणि मुरघासाचा वापर करून चारा टंचाईवर मात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. टी. बुचाले यांनी दिली. सध्या हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी होत असल्याने ऊसाचे वाढे शेतातच पडून राहतात.

Fodder Shortage
Republican Sena Protest : रिपब्लिकन सेनेचे आसूड आंदोलन

त्यांचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना ऊसतोडणीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. ऊसतोडणी मजुरांमार्फत केल्यास हे वाढे पशुधनासाठी उपलब्ध होऊ शकतात. पूरक खाद्यासोबत त्यांचा वापर केल्यास दुष्काळात चारा उपलब्धतेस मदत होईल.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांतील पाणी कमी झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा जमिनीवर ज्वारी, मका आणि बाजरी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे.

शासनाच्या नियमानुसार या जमिनी शेतकरी, पशुपालक आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. वनक्षेत्रातील उपलब्ध गवताचा नियमानुसार पशुधनासाठी वापर करण्याच्या दृष्टीने वन विभागालाही उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

Fodder Shortage
Abhijeet Dipke Grandmother Death: अभिजीत दिपकेंच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर; आजीचे झाले निधन

हिरव्या चाऱ्याची साठवणूक करून तो टंचाईच्या काळात वापरता यावा, यासाठी मुरघास निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. चारा उत्पादक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर तातडीने लिलाव प्रक्रिया राबविण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध ठेवण्यास मदत होईल, असे डॉ. बुचाले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news