

Maratha reservation Manoj Jarange Patil
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे. या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे दिला. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमची लढाई सुरू आहे. या मागणीसाठी आता राज्यातील सर्व मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा आमचा उद्देश नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीचा त्यांनाही फायदा होणार आहे. आम्हाला न्याय देणारी मुंबई आहे. प्रत्येक जण न्यायासाठी मुंबईत आंदोलन करतात. त्यानुसारच आमचे आंदोलन आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आंदोलनासाठी सरकारला दोष द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यामध्ये ओबीसी व मराठा यांच्यामध्ये वाद पेटवला जात आहे. घ्यायचं नाही असेही त्यांनी सांगितले. राज्यातील इतर समाजाने त्यांच्या प्रश्नांसाठी मदत मागितली तर त्यांच्या प्रश्नासाठी ही आंदोलन करणार असल्याची ही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असे म्हटले नाही. कारण सत्ताधारी व विरोधक कोणीही आरक्षण देतो असे म्हटले नव्हते. त्यामुळे आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट दिसत होते. मात्र मराठा दलित मुस्लिम हे समीकरण जुळले असते तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.