Hingoli news | कालिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

८ ते १० एप्रिल या कालावधीत जवळाबाजार-औंढा नागनाथ मार्गावरील कालिका नगर (माऊली मॉलच्या मागे) येथे हे धार्मिक विधी पार पडणार आहेत.
Hingoli news
Hingoli news
Published on
Updated on

जवळाबाजार : येथील सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज बांधवांच्या वतीने नवनिमित भव्य श्री कालिका देवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० एप्रिल या कालावधीत जवळाबाजार-औंढा नागनाथ मार्गावरील कालिका नगर (माऊली मॉलच्या मागे) येथे हे धार्मिक विधी पार पडणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा:

  • ८ एप्रिल: सकाळी ७ वाजता विष्णू कुटाफळे पोलीस चौकी परिसरापासून भव्य शोभायात्रा. सकाळी ९ वाजता गणेश पूजन, मूर्ती धान्यवास व आरती. दुपारी २ ते ५ कालिका पुराण, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ.

  • ९ एप्रिल: देवता स्थापना, हवन, आरती, कालिका पुराण, भजन आणि हरिपाठ.

  • १० एप्रिल: मुख्य सोहळा - मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, आरती आणि दुपारी महाप्रसाद.

प्रमुख उपस्थिती:

हा सोहळा श्री १००८ आत्मानंद गिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण आणि वेदमूर्ती सुधीर महाराज जोशी (शिरडशहापूर) यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सोमवंशीय समाज अध्यक्ष शरदराव भांडेकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजूभैया नवघरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सरपंच स्वातीताई अंभोरे यांच्यासह अरुण शेठ वेळापुरे, श्रीकांत भुजबळ, मंगेश विभुते व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विष्णू कुटाफळे, उपाध्यक्ष प्रदीपराव आदमाने, सचिव डॉ. गजानन महाजन यांच्यासह सर्व सदस्य, युवा कार्यकारिणी आणि महिला मंडळाने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news