Hingoli Crime : १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई
Illegal Liquor Transport
Illegal Liquor Transportpudhari photo
Published on: 
Updated on: 

कळमनुरी : कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमावर मंगळवारी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी रात्री दरम्यान शहरातील उत्कर्ष ढाब्याच्या समोर मसोड फाट्याजवळ कैलास सटवाजी टाले, रा. मुंढळ हा आरोपी अवैध रित्या देशी दारू विक्री साठी नेत असताना पकडले असता खाकी रंगाच्या बॉक्स मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या १८० च्या काचेच्या एकूण १४४ सिलबंद बॉटल, प्रत्येकी ८० रुपये प्रमाणे १ लाख रूपये किंमतीची व एक स्कुटी विना क्रमांकाची असा एकूण देशी दारू व स्कुटी मिळून १ लाख ११ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal Liquor Transport
Nanded Women Farmers Registration : महिला शेतकरी नोंदणीत किनवट जिल्ह्यात अव्वल

आरोपीने त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तीन खाकी रंगाचे बॉक्स मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या १८० च्या १४४ बॉटल त्याच्या ताब्यातील स्कुटीवर घेऊन जात असताना बेकायदेशीररित्या विनापरवाना चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्याने पोलीस उपाधिक्षक मयूर रसाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Liquor Transport
Ashok Chavan Birthday : दुष्काळाचे कारण... मुखपत्रात जाहिरातींचे ‘तोरण!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news