जवळाबाजार सलग तिसरा दिवशी कृषि केंद्र बंद

Hingoli News | आज सलग तिसऱ्या दिवशीसुध्दा जवळाबाजार येथील कृषि केंद्र बंद आहेत.
Strike
strikepudhari
Published on
Updated on

जवळाबाजार : राज्यात कृषि विक्रेत्यांवर होत असलेला जाचक अटीविरूद्ध हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार येथील कृषिकेंद्र सलग तिसरा दिवशी सुध्दा बंद करण्यात आले. परिसरातील बागायतदार क्षेत्र असलेला शेतकरी बांधवास मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

राज्य कृषि विक्रेता संघ यांचा शासनाकडून दरवर्षी कृषि विक्रेत्यांवर मोठ्याप्रमाणात जाचक नवनवीन अटी लावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषि केंद्र व्यापारी वर्गाकडून सोमवारपासून बेमुदत बंद एल्गार देण्यात आला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीसुध्दा जवळाबाजार येथील कृषि केंद्र बंद आहेत.

परिसरात मोठ्या प्रमाणात बागायतदार क्षेत्र असल्याने शेतकरी बांधवास बियाणे खत कीटकनाशक लागतात तर १ 'मे पासून बागायतदार क्षेत्रामध्ये कापुस मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरूवात होत असते. तर खरीप हंगामातील पेरणीस बियाणे रासायनिक खत कीटकनाशक शेतकरी बांधव मोठ्याप्रमाणात एप्रिल महिन्यात शेवटचा आठवड्यात खरेदीस सुरूवात करतात. कारण खरीप हंगामातील पेरणी वेळेस मोठ्याप्रमाणात बियाणे रासायनिक खत तुटवडा निर्माण होत असतो.

यासाठी आतापासुन खरेदी करण्यात येत असते पण सध्याच परिस्थितीत कृषि केंद्र बेमुदत बंद सुरू असल्याने आगामी खरीप हंगामातील पेरणीस विलंब व बियाणे रासायनिक खत कीटकनाशक पुरवठयास विलंब आणि तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी शासनाकडून या कृषि केंद्र बंद तोडगा काढून सुरळीत कृषि केंद्र सुरू करावे; अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवाकडून करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news