

In Hingoli, two real brothers were subjected to a life-threatening attack following a minor dispute
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ;
शहरातील वर्दळीच्या हरण चौक भागात शुक्रवारी (दि. ७) किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांच्या टोळक्याने दोन सख्ख्या भावांवर चाकू आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या रक्तपाताच्या घटनेप्रकरणी शनिवारी रात्री हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तलाबकट्टा भागात राहण ारे सय्यद वसीम यांचा पेन्शनपुरा येथील अब्बास कुरेशी याच्यासोबत काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी सय्यद वसीम हरण चौक भागात आले असता, अब्बास कुरेशी याने आपल्या साथीदारांसह त्यांना गाठले. जुन्या वादाची कुरापत काढून आरोपींनी वसीम यांच्याशी हुज्जत घातली.
शाब्दिक बाचाबाचीनंतर प्रकरण हाणामारीवर आले. यावेळी अब्बास कुरेशी याने लोखंडी रॉडने, तर इतर आर- ोपींनी चाकूने वसीम यांच्या डोक्यात वार केले. आपल्या भावावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सय्यद वसीम यांचे भाऊ सय्यद कलीम हे घटनास्थळी धावून आले.
मात्र, रक्ताची चटक लागलेल्या टोळक्याने त्यांनाही सोडले नाही. आर- ोपींनी कलीम यांच्यावरही लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.