हिंगोली : मराठा आरक्षणासाठी एकाने संपविले जीवन

शेवाळा येथील घटना
Hingoli News
मराठा आरक्षणासाठी एकाने जीवन संपविले
Published on
Updated on

आखाडा बाळापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील एकाने गळफास घेऊन जीवन संपविले. बुधवारी (दि.१२) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोहन रामराव सावंत (वय ४९) असे या तरूणाचे नाव आहे.

शेवाळा येथील मोहन सावंत हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय होते. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी चिठ्ठी लिहून राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणातून कंटाळून जीवन संपवित आहे, असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. आखाडा बाळापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सावंत यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news