हिंगोली: पाण्याचा ठणठणाट; जलकुंभावर चढून तरुणांचे शोले स्टाईल आंदोलन

Hingoli News | येहळेगावात तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
youth  water tank agitation in Yehalegaon
येहळेगाव सोळंके येथे तरुणांनी जलकुंभावर चढून पाण्यासाठी आंदोलन केले. Pudhari Photo
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : एक नव्हे दोन नव्हे, तर तीन योजना राबवून देखील गावात उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई कमी करण्यात प्रशासनाला यश येत नाही. याच्या निषेधार्थ औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे तरुणांनी जलकुंभावर चढून आज (दि.27) आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.

गावात पाणी मिळत नसल्याने लोकांनी अगोदरच जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवली होती. परंतु कुठली दखल घेतली गेली नसल्याने युवकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे जल जीवन मिशन अगोदर गावात दोन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आलेले आहेत. परंतु एकही टाकी लोकांच्या तहान भागवण्यास कामी पडत नाही. शिवाय गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत देखील फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नित्याचीच झाली आहे.

तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे 

येहळेगाव सोळंके येथे तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी हिंगोली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते नरवाडे, अभियंता बोरकर यांची उपस्थिती होती. लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती शुभम सोळंके यांनी दिली.

youth  water tank agitation in Yehalegaon
हिंगोली : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, दोन मुले जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news