

Bhikajirao Avchar Unopposed Sengaon APMC Selection
सेनगाव : सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भिकाजीराव देवराव अवचार यांची मंगळवारी (दि. १ ) बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सभापती चंद्रकांत हराळ यांनी ठरल्याप्रमाणे १९ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
या रिक्त पदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी म्हणून सेनगावचे सहाय्यक निबंधक अक्षय गुट्टे व बांडे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. सभापतीपदासाठी निर्धारित वेळेत केवळ भिकाजीराव अवचार यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
या विशेष सभेला बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते. यामध्ये उपसभापती सौ. छाया बालासाहेब पोले, माजी सभापती चंद्रकांत हराळ, अशोक ठेंगल, मदन इंगोले, वैभवराजे देशमुख, संजयभैया देशमुख, नथ्थुजी कावरखे, भास्करराव पाटील, संतोष देवकर, सौ. दीक्षा नरवाडे, सौ. संजीवनी बोरुडे, पुरुषोत्तम गडदे, विकास शिंदे, प्रकाश बिडकर आणि अंकुश तिडके यांचा समावेश होता.
बाजार समितीचे सचिव शिवाजी बुळे, निरीक्षक आर. आर. पतंगे, व्ही. टी. नरवाडे, आर. बी. पवार, शेख वसीम, मधुकर लांभाडे, मुकेश देशमुख आणि शिवाजी तिडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
भिकाजीराव अवचार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर होताच बाजार समिती परिसरात समर्थकांनी जल्लोष केला. परभणी-हिंगोली मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, दिनकरराव देशमुख, आप्पासाहेब देशमुख, रुपालीताई पाटील गोरेगावकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सभापती भिकाजीराव अवचार यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.