Hingoli Rain News : साहेब, पावसानं होत्याचं नव्हतं केलं हो...!

शेतकऱ्यांचा प्रशासन दरबारी आक्रोश, मदतीकडे बळीराजाचे लक्ष
आर्त विनवणीच्या स्वरात शेतकरी आपल्या व्यथा नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांपुढे मांडत आहेत.
आर्त विनवणीच्या स्वरात शेतकरी आपल्या व्यथा नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांपुढे मांडत आहेत.
Published on
Updated on

हिंगोली: गजानन लोहे

साहेब, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. सर्व पिकं पावसाने खरडून नेली. घरे वाजून गेली. पावसानं होत्याचं नव्हतं केले हो...! आर्त विनवणीच्या स्वरात शेतकरी आपल्या व्यथा नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांपुढे मांडत आहेत. जिल्हयात मागील महिन्याभरापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. परंतु, अद्यापही शासनाची मदत मात्र शेतक-यांच्या हाती पाहली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

महिन्याभरापासून सातत्याने जिल्हयात कधी मुसळधार तर कधी ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९८० मि.मी. पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी १२९.१ टक्का अशी आहे. दररोजच भाग बदलून पाऊस पडत आहे. उभी पिके आडवी होऊन सडू लागली आहेत. यंदा शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नसल्याने शासनाने भरीव मदत करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जुन्या निकषानुसार हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणार नसल्याने शासनाने ही मदत देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या आकडेवारीनुसार एकूण ३ लाख ८० हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ७१ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याने नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २३१ कोटी रुपयांचा निधी गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेजारच्या नांदेड व इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत वाटप केली जात आहे. परंतु, हिंगोलीतील शेतकऱ्यांना मात्र अजून किमान एक ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पहावी लागणार आहे.

वसमत : ढगफुटीसदृश पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरले
वसमत : ढगफुटीसदृश पावसाने नागरिकांच्या घरात पाणी शिरले

ढगफुटीसदृश पावसाने पिके उद्ध्वस्त

श्रीधर मगर, सिंदगी : कळमनुरी

तालुक्यातील सिंदगी परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल अर्धा ते एक तास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने झेंडू, सोयाबीन या नगदी पिकांसह कापूस व हळद पिकांवरही मोठा परिणाम झाला.

सिंदगीसह बोल्डा, जांब, येहळेगाव गवळी, कोंढुर, डिग्रस व गोर्लेगाव या गावांमध्ये शेतकरी अनेक वर्षांपासून झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत झेंडूला प्रचंड मागणी असते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानले जाते. झेंडूच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांची दिवाळी रंगतदार करीत असे. मात्र यंदा सततच्या पावसामुळे झेंडूची वाढ अडथळ्यात आली होतीच; त्यातच सोमवारी झालेल्या पावसाने उरलेसुरले पीकही पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. झेंडू व्यतिरिक्त सोयाबीन पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने त्या कुजण्याची शक्यता आहे. कापूस व हळद पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

आम्ही वर्षभर झेंडू व सोयाबीन पिकांवर खर्च करून मोठ्या आशा बाळगल्या होत्या. आता ढगफुटीसदृश पावसाने सारेच पिकं नष्ट झाले. दिवाळीत कुटुंब कसे चालवायचे, कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे असे शेतकरी सांगत आहेत. परंतु, कृषी मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे.

टेंभुर्णी परिसरात ढगफुटी सदृश पावसाचा हाहाकार

भीमराव बोखारे, वसमत

वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावामध्ये रात्री साडेसात वाजता ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीसह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. रात्री आठच्या दरम्यान टेंभुर्णी येथील पन्नास घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र पहायला मिळाले.

एवढा पाऊस मागील अनेक वर्षांपासून कधीच पडला नव्हता असे गावातील जाणकार व जुन्या मंडळींकडून सांगण्यात येत आहे. टेंभुर्णी गावातील चांभार गल्ली, कुंभार गल्ली, मुस्लिम वाड्यातील काही घरांमध्ये रात्री पुराचे पाणी गेल्यामुळे त्यांच्या घरातील संसारोपयोग वस्तूसह अन्नधान्य, मौल्यवान वस्त महत्त्वाची कागदपत्रे पुराच्या पाण्यामुः भिजून गेले. यामध्ये महिला वयोवृद्धांची धावपळ उडाल्या पहावयास मिळाले. गावातील तरु मंडळींनी महिला मुलं व वयोवृः महिला, पुरुषांना गावातील शाळेमध् रात्रभर आश्रय दिला. टेंभुर्णी गावांमध् घरांच्या झालेल्या नुकसानीबद्दः प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहे मात्र शेतीच्या झालेल्या नुकसानीबाब अजूनही प्रशासन दिरंगाई बाळग असल्याचे चित्र टेंभुर्णी परिसरात गावात दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news