Hingoli teacher appointment : शिक्षणाधिकाऱ्यांचा उपहासात्मक सत्कार चर्चेत

आंदोलनानंतर शिक्षकाची नियुक्ती, हट्टा येथील रिक्त पदाचा प्रश्न सुटला
Hingoli teacher appointment
Hingoli teacher appointmentpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली/ हट्टा : येथील पीएमश्री शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर गावकऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत शाळा भरो आंदोलन केल्यानंतर तातडीने शिक्षकाची नियुक्ती केल्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांचा पुष्पहार घालून उपहासात्मक सत्कार केला.

हट्टा येथे जिल्हा परिषदेची पीएमश्री शाळा असून या ठिकाणी पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत अराजपत्रित मुख्याध्यापक, इंग्रजी, विज्ञान शिक्षकाची पदे रिक्त असून सेवक देखील नाही. मुख्य विषयाचे शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे भरण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती.

Hingoli teacher appointment
D.Y. Patil death : ‘शंकररावांसाठी सह्यांची मोहीम राबविलेला नेता’

या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनावर २० जुलै रोजी लेखी पत्र देऊन तातडीने शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले होते. मात्र त्यानंतरही शिक्षकांची नियुक्ती झालीच नाही. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी ३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतरही शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने गावकऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये शाळा भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार मंगळवारी गावकरी व विद्यार्थी जिल्हा परिषदेत दाखल झाले. गावकरी व विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला. दरम्यान, दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन सुरू झाले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

Hingoli teacher appointment
Dharashiv rain update : तालुकानिहाय मोठी तफावत; भूम-कळंब आघाडीवर!

यावेळी गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देऊनही त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष का केले असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. आता तुम्हाला शिक्षक दिले आहेत असे शिक्षणाधिकारी काळे यांनी सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी आम्ही आंदोलन केल्यानंतर शिक्षक दिले अशी भूमिका घेत शिक्षणाधिकारी काळे यांचा उपहासात्मक सत्कार केला. त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

  • विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभाग चांगलाच चर्चेत आला असून सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रकार घडला आहे. या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तही मागविला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news