Sugar price hike Maharashtra: श्रावण-सणासुदीआधी साखर महागली; गोडीवर पडले महागाईचे सावट

महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले; सण गोड करण्याची चिंता
Sugar
SugarPudhari
Published on
Updated on

वसमत : पवित्र श्रावण मास सुरू झाला असून गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा सारखे सण तोंडावर आले आहेत. मात्र यावेळी गोडधोडाच्या सणांवर साखरेच्या वाढत्या दरांचे कडू सावट पडले आहे. किरकोळ बाजारात साखर 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने गृहिणींचे बजेट देखील कोलमडले आहे.

Sugar
Sugar Price Hike | साखरेचा गोडवा महागला; किरकोळ दर प्रतिकिलो ६७ ते ७० रुपयांपर्यंत

श्रावणात उपवास, नैवेद्य आणि सणासाठी गोड पदार्थांना मोठी मागणी असते. लाडू, पुरणपोळी, खीर, बासुंदी यासाठी लागणारी साखरच आता परवडेनाशी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या दरात20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे.

Sugar
Sugar Price Hike: साखरेच्या दरात तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ; किरकोळ दर ६० रुपयांवर

गृहिणी काय म्हणतात?

"पूर्वी 1 किलो साखरेत महिनाभराचे पदार्थ व्हायचे. आता एक किलो साखरेसाठीही 60,65 रुपये मोजावे लागतात. गणपतीसाठी किती गोड करायचे हाच प्रश्न पडला आहे" अशी खंत गृहिणींनी व्यक्त केली.

Sugar
Sugar Price Rise: साखर दरवाढीला केंद्राचा लगाम; कारखान्यांना सात दिवसांपेक्षा जास्त साठवणुकीवर बंदी

व्यापाऱ्यांचे म्हणणे...

साखरेचे उत्पादन घटणे आणि मागणी वाढणे यामुळे दर वाढल्याचे किराणा व्यापारी सांगतात. सणासुदीला दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्याचे म्हणणे...

आम्ही वर्षभर राब राब राबून घामाचे पाणी करून शेतामध्ये ऊस पिकवतो आणि कारखानदार कवडीमोल भावाने आमचा ऊस विकत घेतात त्यामध्ये शासनाचे काही निर्बंध घातले एफ आर पी नुसार शेतकऱ्यांना भाव द्यायला पाहिजे परंतु वसमत तालुक्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना 25 शे ते26 शे रुपये पर्यंत भाव देऊन मोकळे होत आहेत यामुळे शेतकरी सुद्धा चिंतातून झाले आहेत. श्रावणातील भक्तीचा गोडवा टिकवण्यासाठी सरकारने साखरेच्या दरावर नियंत्रण आणावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news