

हिंगोलीः सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथे होऊ घातलेला पाणी साठवण तलाव तात्काळ रद्द करुन पर्याय म्हणून कयाधु नदी पात्रात येलदरी धरणातुन डावा कालवा काढाण्यात यावा. या मागणी संदर्भात सुकळी खु,सुकळी बु व दाताडा खु,दाताडा बु या चार गावातील शेतकरी आक्रमक होत त्यांनी या संदर्भात दि.१७ नोव्हेंबर सोमवार रोजी सेनगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील सुकळी येथे होऊ घातलेल्या पाणी साठवण तलावात सुकळी खु,सुकळी बु व दाताडा खु,दाताडा बु या गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायती जमिनी पुर्णपणे जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. सदरील तलावाच्या माती परीक्षण करण्याचे काम चालु आहे.
सदरील तलावाच्या कामाची आम्हाला कोणत्या ही प्रकारची पुर्वसुचना दिली नाही.किंवा आमची कोणत्या ही प्रकारची संमती घेतलेली नाही.असा आरोप करीत सदरील तलाव झाल्यास तर आम्हा सर्व शेतकऱ्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही.कारण आमच्या उदर्निवाहाचे करण्याचे एकमेव साधन शेतीच आहे.तरी सदरील तलाव तात्काळ रद्द करुन पर्याय म्हणुन येलदरी धरणातुन डावा कालवा काढण्यात यावा अन्यथा सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील दिलेल्या निवेदनात दिला आहे.यावेळी शेतकरी महादेव शिंदे,गोपाल गवळी,तान्हाजी साबळे,काशिराम साबळे,गजानन सरगड,गणेश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.