

Hingoli News: Protest registered by throwing money at the Agriculture Officer's office
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे तसेच बोगस जैविक कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक स्वरूपात पैसे फेकून निषेध नोंदविला.
जिल्ह्यात बेसुमार बोगस बियाणे व कीटकनाशकांची विक्री होत असताना कृषी विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बुधवारी आक्रमक झाले.
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात पैसे फेकून कृषी विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यात आला. बोगस कृषी निविष्ठांविरोधात तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.