Hingoli News | पिंपरी खुर्द येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन संपवले जीवन

कर्जबाजारीपणा व शेतीतील नुकसानीमुळे टोकाचे पाऊल; बाळापूर पोलिसांत नोंद
Hingoli News | पिंपरी खुर्द येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन संपवले जीवन
Published on
Updated on

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व शेतीतील सततच्या नुकसानीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बबनराव धांडे (वय 27, रा. पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील शेत परिसरात ही घटना घडली.

याबाबत मृताचा भाऊ गणेश उर्फ पप्पू बबनराव धांडे यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. शेतीतील नापिकी, आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या वाढत्या ताणामुळे सचिन धांडे यांनी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news