

हिंगोली - राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्याने ११९७ अंगणवाड्यांमधून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल १८ लाख नोंदी घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
राज्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून सप्टेंबर महिन्यात पोषण माह राबविण्यात आला. यामध्ये १ लाख अंगणवाड्यांमधून विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी देण्याच्या सूचना आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या.या उपक्रमात अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्यासोबतच गरोदर व सानदायावांसाठी मार्गदर्शन, दररोज नवीन रेसीपीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार देणे यासह इतर उपक्रमांचा समावेश होता. दरम्यान, हिंगोली जिल्ल्यात जिल्हाधिकारी अभिनय गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार गांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश बाथ तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी सहा प्रकल्पांमनील अंगणवाड्यांमधून उपक्रम उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती. हिंगोली जिल्ह्यातील ११९७ अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल १८ लाख उपक्रमांची ऑनलाईन नोंद घेतली आहे. सर्वात जास्त उपक्रम न नोंदी नेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.
मुंबई पंथील भायखळा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात शुक्रनारी महिला व बालविका मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिनय गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाच यांचा सत्कार केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने यापूर्वीही आयुक्तालयाकडून दिलेल्या सूचनांनुसार कामे करून सरस कामगिरी केली आहे. आधार व्हेरीफिकेशन, एकसमान रंगरंगोटी, घुमुक्त अंगणवाडी, पोषण ट्रॅकरणध्येही यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.