

Hingoli MLA Pragya Satav News
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: येथील स्व. राजीव सातव नाट्यगृहाच्या अंतर्गत कामासाठी दहाकोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा आणि कळमनुरी तालुक्यातील शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची निविदा तात्काळ काढण्यात यावी या प्रश्नावर पुरवणी मागण्या दरम्यान सभागृहात आवाज उठविला.
स्व. राजीव सातव नाट्यगृह उभारणी करिता राज्य शासनाने वैशिष्टपूर्ण योजनेतून चार वर्षापुर्वी ८ कोटी रूपये निधी उपलब्ध करुन दिला होता. त्या निधीतून ईमारत उभारणी झाली परंतु नाट्यगृहाचे अंतर्गत काम अर्धवट स्थितीत असून हे काम पूर्ण करण्यासाठी लागणारा दहा कोटीचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.
हिंगोली जिल्ह्यातील ईसापुर धरणाच्या जलाशयातून कळमनुरी तालुक्याच्या शेनोडी या गावापासून शेनोडी रामवाडी ही उपसा सिंचन योजना प्रस्तावित केलेली आहे. या प्रस्तावित शेनोडी- रामवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली उपसा सिंचन योजना करता १९५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा प्रस्ताव आहे.
योजनेच्या सर्वेक्षणासाठी ६३ लक्ष २२ हजार ५०० रुपयाचा निधी मंजूर केला असला तरी यासंदर्भात निविदा अद्याप काढलेली नाही त्यामुळे ही प्रलंबीत निविदा तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी पुरवणी मागण्या दरम्यान केली.