हिंगोली : पोत्रा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Hingoli crime News | दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
हिंगोली : पोत्रा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
File Photo
Published on
Updated on

आखाडा बाळापूर पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा जणांनी अत्याचार केल्या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह पोक्सो ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे कोंढुर ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील दोघा नराधमांनी सदर 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये अनधिकृत प्रवेश करून तिचे इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही बाब जर तू कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या आईला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली, त्यानंतर सदर पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सतीश बळीराम जाधव वय 30 वर्षे, आणि पवन उर्फ पप्पू मारुती शिंदे वय 30 वर्ष दोघे ही रा. कोंढूर या दोघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

याप्रकरणी बसमत चे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. बी. केंद्रे , पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे , पंढरीनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे . याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी केंद्रे हे अधिक तपास करीत आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news