Hingoli Accident News | हायवा ऑटोवर उलटल्याने २ प्रवाशी ठार, ३ गंभीर जखमी

Wasmat Accident | वसमतच्या कौठा रोड भागातील घटना
Hyva overturns on Auto in Koutha Road
हायवा उलटून ऑटोवर पडल्यामुळे ऑटोतील दोघे जण चिरडून ठार झाले.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Hyva overturns on Auto

वसमत : येथील कौठा रोड भागात भरधाव हायवा उलटून ऑटोवर पडल्यामुळे ऑटोतील दोघे जण चिरडून ठार झाले. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.३) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण झाले होते. या अपघातानंतर हायवा चालक पसार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत येथील कौठा रोड भागातील एका वीटभट्टीसाठी हायवामधून मातीची वाहतूक केली जात होती. आज दुपारच्या सुमारास माती घेऊन निघालेला हायवा (एमएच-20-टी-9797) कौठा रोडच्या दिशेने जात होता. यावेळी मदिना चौक भागात चुकीच्या दिशेने येणाऱ्या या हायवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या ॲटोला धडक दिली.

या अपघातानंतर हायवा जागेवरच उलटला. पण दुर्दैवाने प्रवाशांनी भरलेला ऑटो त्याखाली सापडला. या अपघातात ऑटोतील यास्मीन मोईनखान (रा. मनमाड) व शेख शोएब (वय 14, रा. कुरुंदा) यांचा हायवाखाली चिरडल्याने मृत्यू झाला. तर आझाद मोईनखान (वय 7), आफान मोईनखान (वय 5, दोघे रा. मनमाड), संतोष खनके (वय 40, शामनगर वसमत) हे ऑटोबाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, महाजन, जमादार गजानन भोपे, शेख इम्रान, विनोद दळवी, रवी बोरलावार, प्रशांत मुंढे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तेथील गर्दी हटविल्यानंतर दोन जेसीबी, एक क्रेनच्या मदतीने हायवाला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. हायवाखाली सापडलेल्या ऑटोचा चुराडा झाला. जखमी तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार राजेश नवघरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.

Hyva overturns on Auto in Koutha Road
Hingoli News | हिंगोली: जामगव्हाण येथे आई - मुलीचा विहिरीत बुडून अंत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news