Hingoli News | जवळाबाजारचा पारा ४२ अंशांवर; कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत

महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत
 Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

जवळाबाजार : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत असून, जवळाबाजार परिसरात आज या वर्षातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून तापमान सातत्याने ४० अंशांच्या वर राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सकाळी ११ वाजल्यापासूनच उष्णतेच्या लाटा सुरू होत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक उष्णतेपासून बचावासाठी कुलर आणि एसीचा आधार घेत आहेत, मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

दरम्यान, बसस्थानक परिसरात शीतपेये, उसाचा रस आणि आईस्क्रीमच्या दुकानांवर सायंकाळच्या वेळी नागरिकांची गर्दी होत आहे. येत्या दीड महिन्यात उष्णता किती वाढेल, या चिंतेने नागरिक ग्रासले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news