

पुढारी: वसमत आणि कळमनुरी तालुक्यांना आज रविवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवून टाकले. दुपारी 3 वाजून 36 मिनिटांनी सिंदगी, गिरगांव, टोकाई, कोठारी, आखाडा बाळापूर, वारंगा, बोल्डा, जांब, पांघरा शिंदे आणि येहळेगाव गवळी यांसह अनेक गावांमध्ये सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या अनपेक्षित कंपनामुळे नागरिक भयभीत होऊन तात्काळ घराबाहेर पडले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला धक्का काही काळ जाणवला, तर त्यानंतर काही सेकंदांच्या अंतराने आणखी दोन सौम्य धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याचे वृत्त आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू सिंदगीजवळील ग्रामीण परिसरात असण्याची शक्यता आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा, दांडेगाव, वारंगा फाटा बाळापूर दिग्रस, जवळा पांचाळ आदी परिसरामध्ये शेनिवारी दुपारी 3.37 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मागील वर्षी ऑक्टोबर 2024 महिन्यामध्ये भूकंपाची दोन सौम्य हादरे जाणवले होते त्याचप्रमाणे शेनिवारी दुपारी (दि.२५) गुड आवाजासह समय धक्का जाणवला गावागावांमध्ये भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्या असून रस्त्यावर ठिकठिकाणी ग्रामस्थ भयभीत झाल्याचे दिसून येत आहेत.
मागील बऱ्याच महिन्यापासून भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा असल्याचे स्पष्ट झाले होते. पण ऑक्टोबर महिन्यामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू हदगाव तालुक्यातील सावरगाव येथे असल्याचे संबंधितांकडून समजले आहे. त्यावेळी ३.८ ची तीव्रता जाणवली होती त्यानंतर आज पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून परिसरातील गावांपैकी येथे सम्यधक का जाणवला पण कर्कश्य आवाज मोठया प्रमाणात असल्याचे सांगत आहेत.