Hingoli crime: सततच्या त्रासाला कंटाळून युवकाने जीवन संपवले

या घटनेबाबत अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही
Death
DeathPudhari
Published on
Updated on

औंढा नागनाथ : तालुक्यातील हिवरखेडा येथील रहिवासी आदेश उत्तमराव ठोके (वय : 25 वर्षे) हे येळी फाटा येथे पंक्चरचे दुकान चालवून आपली उपजीविका करीत होते. मात्र, त्यांना ‘इथे दुकान का लावतो?’ असे म्हणत काही जणांकडून नेहमी व सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

Death
Hingoli Crime : किरकोळ वादातून दोन गटांत तुफान हाणामारी

रोडवर दुकान लावू न देण्यासाठी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने त्रासाला कंटाळून आदेश ठोके यांनी 24 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान मौजे येळी फाटा येथील आंधळे कॉम्प्लेक्समध्ये जीवन संपवले.

Death
Hingoli Crime : किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; ११ जणांवर गुन्हे दाखल

या प्रकरणी सरपंच संतोष नागोराव मोरगे, उपसरपंच बाळासाहेब भानुदास सानप, भानुदास सानप, विठ्ठल नागोराव मोरगे, नागोराव नामदेव मोरगे (सर्व रा. हिवरखेडा) आणि नारायण बाबुराव आंधळे यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख व पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली.

Death
Hingoli Crime : पोलिस असल्याची बतावणी करून निवृत्त शिक्षकाला भररस्त्यात लुटले

फिर्यादी श्रीरंग फकीरा खिल्लारे (रा. हिवरखेडा) यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख करीत आहेत. याबाबत अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news