Hingoli crime news | चिखला काकड येथील अमानुष घटनेचा सेनगावात तीव्र निषेध

सरपंचाविरोधात संताप व्यक्त करीत CDR तपासणीची मागणी
Hingoli crime news
Hingoli crime news
Published on
Updated on

सेनगाव : चिखला काकड (ता.लोणार जि.बुलढाणा) येथील अमानुष घटनेचा सेनगाव तालुक्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत असुन तेथील सरपंचाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने सरपंच गणेश काकड यांची CDR तपास व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि.२५ फेब्रुवारी) सेनगाव पोलीस स्टेशन व गोरेगाव पोलीस स्टेशनला निवेदन‌ देण्यात आले आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, चिखला काकड येथे घडलेली अमानुष घटना ही केवळ एका व्यक्तीवरील अन्याय नसुन, समाजाच्या स्वाभिमानावर घाला आहे. भगिनी संजीवनीताई वाघ यांच्यासोबत झालेली अमानुष वागणुक आणि एका अल्पवयीन बालका संदर्भात गंभीर आरोप ही बाब समाजात तीव्र संताप निर्माण करणारी आहे. सरपंच गणेश काकड यांची CDR तपास व उच्चस्तरीय चौकशी करुन घटनेची सखोल व निपक्ष चौकशी व्हावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत ही आमची ठाम मागणी आहे.

महिलांचा सन्मान आणि बालकांचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. या प्रकरणावर कोणतीही टाळाटाळ किंवा विलंब होऊ नये अन्यथा सकल मराठा समाज लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल असा इशारा देखील दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देताना मराठा सेवक गंगाधर सरकटे, नगरसेवक अमोल तिडके, स्वप्नील देशमुख, केशव वाबळे, तानाजी वाबळे, गजानन कदम, ज्ञानेश्वर नवले, वैभव कोरडे, हनुमान दरुगे, हनुमान शिंदे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news