Hingoli wife killed |'माहेरी का आलीस?' कारणावरून पती-पत्नीत वाद; पत्नीचा खून करून पतीनेही स्वत:लाही संपवले

Hingoli wife killed |सासू गंभीर जखमी, कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारातील घटना
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन मारहाण करून खून केला. तसेच सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर पतीनेही गळाफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील दीपाली पाईकराव यांचा विवाह काही वर्षापुर्वी धानोरा जहांगिर (ता.कळमनुरी) येथील विशाल डोंगरे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर विशाल याने दीपाली यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या.

मागील काही दिवसांपासून त्या माहेरी खरवड येथे आई, वडिलांकडे शेतात राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विशाल हा त्याच्या सासुरवाडीला खरवड येथे गेला. यावेळी घरी त्याची पत्नी दीपाली व सासू कमलबाई या दोघीच होत्या. यावेळी विशाल व दीपाली यांच्यात वाद सुरु झाला.

शाब्दीक चकमकीनंतर विशाल याने तू माझ्या सोबत येण्याऐवजी माहेरी खरवड येथे का आली? या कारणावरून बाजेच्या लाकडी ठाव्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दीपाली यांचा मृत्यू झाला. तर हे भांडण सोडवताना विशाल याने त्याची सासू कमलबाई यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले.

दरम्यान, काही वेळानंतर कमलबाई यांचे पती व मुलगा शेतातून आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी कमलबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले अन थेट पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिस उपाधिक्षक एन. एस. देशमुख, उपाधिक्षक मयुर रसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, विकास आडे, जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Crime News
Hingoli Accident : हिंगोली-नांदेड रस्त्यावरील अपघातात मोटरसायकलस्वार ठार

घटनास्थळापासून काही अंतरावरच विशाल यानेही गळफास घेऊन जीवन संपवल्याचे दिसून आले. या प्रकरणी कमलबाई यांच्या तक्रारीवरून विशाल याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपाधिक्षक मयुर रसाळ पुढील तपास करीत आहेत.

Crime News
Hingoli Farmer Protest | पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उधळल्या नोटा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news