Hingoli road news | सिमेंट रस्त्याचे भवितव्य धोक्यात....

सिमेंटचे बांधकाम किती कालावधीपर्यंत टिकेल हा प्रश्न अनुत्तरीत राहतो
Hingoli road news
Hingoli road news
Published on
Updated on

नागपूर : वर्धा, यवतमाळ ,पुसद, माळेगाव, पारडीटकमोर, नांदापूर, पिंपळदरी, औंढा नागनाथ, देवगाव फाटा या रस्त्याचे आज घडीला हारवाडी ते औंढा नागनाथ रस्त्याच्या सिमेंट व मजबुतीकरनाचे कोट्यावधी रुपये निधी खर्चाचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. परंतु सदरील कामांमध्ये होत असलेली अनागोंदीआणि अत्यल्प पाणी वापरामुळे सिमेंट रस्त्याचे भवितव्य धोक्यात आले आहे.

राज्य महामार्ग रस्ते विकास मंडळांतर्गत हरवाडी ते औंढा नागनाथ राज्य रस्ता क्रमांक २५७ या दोन पदरी सिमेंटरस्त्याचे बांधकाम पाण्याचा अत्यल्प वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनाच्या मागे उडत असलेल्या भयंकर धुळीमुळे वाहन चालक, दुचाकी चालकासह पादचारी त्रस्त असून त्यांच्याआरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जवळजवळ 27 किलोमीटर रस्त्याच खोदकाम चालू असून आवश्यक त्या ठिकाणी माती मिश्रित मुरूम वापरल्या जात आहे. पाण्याचा वापर अत्यल्प होत असल्याने वाहतुकी मुळे प्रदूषणात वाढ तर होतच आहे. वाहन चालकांच्या डोळे, नाक ,तोंड ,आणि अंगावरील कपडे धुळीने माखल्या जात आहेत.

अनावश्यक ठिकाणी गिट्टीचे ढिगारे टाकल्यामुळे वाहन चालकांच्या लक्षात न आल्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. काम चालू असलेल्या ठिकाणी सूचनाफलक कुठेही दिसून येत नसल्याने वाहन चालकाच्या नाकीनव येत आहे. या सिमेंट रस्त्यावर प्रथम सिमेंटचा थर टाकल्या जात असून काही ठिकाणी दुसऱ्या थराचे काम चालू आहे यामध्ये लोखंडी गजाचा आवश्यक तेवढा वापर दिसून येत नाही. लहान मोठी पूल,नाली बांधकाम,पाण्यामुळे रस्त्याला इजा पोहोचू नये म्हणून सिमेंटची संरक्षण भिंती आणि आवश्यक त्या ठिकाणी सिमेंटचे कामावर पाणी टाकण्याचे प्रमाण कुठेही दिसून येत नाही. यामुळे सिमेंटचे बांधकाम किती कालावधीपर्यंत टिकेल हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

पाण्याचा अत्यल्प वापर होत असल्याने रस्ता निर्मितीच्या भविष्यावर निश्चितच परिणाम होणार असून सध्या मात्र धुळीच्या लोटामुळे वाहन चालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. बहुतांश ठिकाणी खोदकाम न करताच माती मिश्रित मुरूम टाकून त्यावर गिट्टी टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी मुरमाच्या उंचीचे प्रमाण सुद्धा कमी अधिक असल्याचे दिसून येते .सिमेंट रस्त्यावरील पहिला थरामधे सिमेंटचा कमी वापर आणि पाण्याचे अत्यल्प वापरामुळे उखडल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत चालू असलेल्या या दोन पदरी सिमेंट रस्त्याचे भवितव्य होत असलेल्या या अनागोंदी कामामुळे निश्चितच धोक्यात येणार हे मात्र निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news