Hingoli Accident News: बस आणि दुचाकीचा अपघात; एक जण ठार

४५ प्रवाशांचे जीव वाचले
Hingoli Accident News |
Hingoli Accident News: बस आणि दुचाकीचा अपघात; एक जण ठार Pudhari Photo
Published on
Updated on

कळमनुरी: तालुक्यातील वरुड शिवारात महूर ते नांदेड जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी दादाराव वाघमोडे (वय ३५, राहणार कारवाडी, ता. हदगाव, जिल्हा नांदेड) जागीच ठार झाला.

बस आणि दुचाकी यांचा अपघात टाळण्यासाठी बस चालकाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता बस रस्त्याच्या कडेला असलेल्या हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरवर धडकली. तथापि, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वेळेत ब्रेक लावल्याने मोठा अनर्थ टळला आणि बसमधील ४५ प्रवाशांचे जीव वाचले.

ही घटना ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान डोंगरकडा फाट्यावरील ओव्हरब्रिजच्या सर्व्हिस रोडवर घडली. मृतक वाघमोडे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.

घटना कळताच डोंगरकडा पोलीस दुरक्षेत्राचे जमादार संतोष नागरगोजे आणि विठ्ठल जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतकास ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करण्यासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आणि घटनास्थळी पंचनामा करून बस चालकाविरुद्ध पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news