Hingoli Crime : चोरीच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

तिघांना घेतले ताब्यात, ग्रामीण ठाण्यात गुन्हा
Hingoli Crime
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणेpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : शहरातील आझम कॉलनी भागातील तरुणाचा भंगार चोरी व गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयावरून मारहाण करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरालगत हिंगोली ते गारमाळ रोडवर सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिस उपाधिक्षक सतीष वाघ, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले.

Hingoli Crime
Latur Revenue Lok Adalat : ३० सप्टेंबरला महात्मा फुले महसूल लोकअदालत

मृतदेहाची माहिती समाज माध्यमावर प्रसिध्द केली असता सायंकाळी उशीरा मृतदेहाची ओळख पटली. मयत तरुणाचे कुटुंबिय आल्यानंतर त्यांनी सदर मृतदेह शहरातील आझम कॉलनी भागातील शेख शब्बीर शेख रफीक (वय ३४ वर्ष) यांचा असल्याचे सांगितले.

या प्रकरणी मयत शेख शब्बीर यांचा भाऊ शेख शारुख यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांचा भाऊ शेख शब्बीर यांना शहरातील सौरभ पत्रे, नितीन कोल्हे, शिवदास घाडे यांनी सौरभ याच्या भंगार विक्रीच्या दुकानातील भंगार चोरी तसेच गल्यातील पैसे चोरीच्या संशयावरून त्यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी तिघांविरुध्द मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

Hingoli Crime
SC ST Farmer Subsidy : ठिबक-तुषार सिंचनासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान
  • घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव यांचे तातडीने एक पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. पथकाने सौरभ, नितीन व शिवदास यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. उपनिरीक्षक राहुल घुले पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news