Hingoli Fraud | जि.प. कर्मचाऱ्याने म्हैस पालनासाठी १० लाखांचा निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याकडून ४ लाख उकळले

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
Financial fraud
Financial fraudpudhari photo
Published on
Updated on

Hingoli Zilla Parishad Employee Fraud

औंढा नागनाथ : तालुक्यातील येळी येथील शेतकरी विठ्ठल रामप्रसाद सांगळे यांची जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेळीपालन व म्हैस पालनासाठी १० लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ४ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ साली जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले कर्मचारी दत्तात्रय केशव मस्के यांनी त्यांना विश्वासात घेत शेळीपालन व म्हैस पालनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत १० लाख रुपये मिळवून देतो, असे आश्वासन देत त्यासाठी ४ लाख रुपये जमा करण्यास सांगितले.

Financial fraud
Hingoli News | हट्टा ग्रामपंचायतीचा 'रामभरोसे' कारभार: ग्रामसेवक १० दिवसांपासून बेपत्ता, नागरी सुविधांचा बोजवारा

मस्के यांच्या सांगण्यावरून सांगळे यांनी गावातील मित्रांच्या उपस्थितीत ४ लाख रुपये दिले. एक महिन्यात काम पूर्ण होईल, असा विश्वास देण्यात आला होता. मात्र, दीर्घकाळ लोटल्यानंतरही कोणताही निधी मिळाला नाही. पैसे परत मागितल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप आहे.

तसेच पैसे मागण्यासाठी तगादा लावल्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. “मी शासकीय कर्मचारी असून कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीन,” अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे.

Financial fraud
Hingoli News : कयाधूचे पाणी पुन्हा पेटणार

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा व फसवणूक केलेले ४ लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणी सांगळे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार औंढा नागनाथ, गटविकास अधिकारी औंढा नागनाथ, तसेच पोलीस अधीक्षक हिंगोली यांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news